Anuradha Vipat
काही व्यक्तींची पचनसंस्था खूप वेगवान असते किंवा अनुवांशिक कारणामुळे त्यांचे वजन वाढत नाही.
तुम्ही दिवसातून जेवढ्या कॅलरी जाळता, त्यापेक्षा जास्त कॅलरी खाणे आवश्यक आहे.
स्नायू वाढवण्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत. आहारात अंडी, पनीर, डाळी, सोयाबीन आणि चिकनचा समावेश करा.
बदाम, काजू, अक्रोड आणि मनुके आणि खजूर खाल्ल्याने वजन लवकर वाढते.
दही, तूप, लोणी आणि चीज यांचा आहारात नियमित वापर करा. तुपाचे सेवन केल्याने नैसर्गिकरीत्या वजन वाढण्यास मदत होते.
रोज सकाळी २ केळी आणि एक ग्लास दूध घेतल्यास शरीराला भरपूर ऊर्जा आणि पोषण मिळते.
बटाट्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्च असते, जे वजन वाढवण्यास मदत करतात.