Anuradha Vipat
आईस्क्रीम खायला लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडते, पण त्याचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
नियमित आईस्क्रीम खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढते, ज्यामुळे वजन वेगाने वाढू शकते.
यामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
आईस्क्रीममध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रायग्लिसराईड्स असतात. याचे जास्त सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल वाढून हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो.
अति थंड आणि गोड असल्यामुळे आईस्क्रीममुळे दातांमध्ये सेन्सिटिव्हिटी आणि कॅव्हिटी होऊ शकते.
काही लोकांना 'लॅक्टोज इनटॉलरन्स' असतो, अशांना आईस्क्रीम खाल्ल्याने पोट फुगणे, गॅस किंवा जुलाब होण्याचा त्रास होऊ शकतो.
रात्रीच्या वेळी किंवा हिवाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्याने घसा खवखवणे, सर्दी, खोकला आणि सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो.