Anuradha Vipat
उन्हाळ्यात एसी वापरताना तो कार्यक्षम राहावा आणि विजेचे बिलही कमी यावे, यासाठी खालील टिप्स फॉलो करणे फायदेशीर ठरते.
तज्ज्ञांच्या मते २४ अंश सेल्सिअस हे मानवी शरीरासाठी आणि वीज बचतीसाठी सर्वात आदर्श तापमान आहे.
एसी चालू असताना पंखा कमी स्पीडवर चालवा. यामुळे खोलीतील थंड हवा सर्वत्र वेगाने पसरते.
एसी लावण्यापूर्वी खोली पूर्णपणे बंद असल्याची खात्री करा.
एसीचे फिल्टर धुळीने भरलेले असल्यास हवा थंड होण्यास वेळ लागतो. दर १५ दिवसांनी एकदा फिल्टर काढून स्वच्छ करा.
रात्री झोपताना टायमर सेट करा. पहाटे हवा नैसर्गिकरित्या थंड असते, त्यामुळे पहाटेच्या वेळी एसी आपोआप बंद होईल.
ज्या खोलीत एसी आहे, तिथे टीव्ही, कॉम्प्युटर किंवा जास्त उष्णता निर्माण करणारे दिवे चालू ठेवू नका.