sandeep Shirguppe
हिरवी मिरची प्रत्येकाच्या घरी ही असतेच, पदार्थांच्या चवीबरोबर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
अतिप्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्यानेही शरिराला नुकसान पोहोचते. यापासून अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचा तिखट घटक असतो यातून पोटात अॅसिडचे उत्पादन वाढल्याने जळजळ होऊ शकते.
जास्त प्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्याने पोटात अल्सर आणि गॅर्स्ट्रिटिस सारख्या समस्या देखील होऊ शकतात.
हिरव्या मिरचीत असणाऱ्या कॅप्सेसिनचा पचनसंस्थेला त्रास होतो, ज्यामुळे अतिसार आणि पोटदुखी होऊ शकते.
हिरवी मिरचीतील कॅप्सेसिन तोंडाच्या नाजूक त्वचेला त्रास देते, ज्यामुळे चिडचिड आणि जळजळ होते.
काही लोकांना जास्त हिरवी मिरची खाल्ल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
जास्त प्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्यानेही झोपेची समस्या उद्भवू शकते.