Anuradha Vipat
दररोज मर्यादेपेक्षा जास्त लोणचे खाल्ल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढून उच्च रक्तदाब आणि किडनीचे आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.
लोणचे चवीला उत्तम असले आणि त्याचे काही फायदे असले, तरी ते रोज आणि जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
रोज लोणचे खाल्ल्याने छातीत जळजळ, ॲसिडिटी, पोटात अल्सर आणि गॅसेसचा त्रास वाढू शकतो.
शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त झाले की लघवीवाटे कॅल्शियम शरीराबाहेर निघून जाते. यामुळे हाडे ठिसूळ आणि कमकुवत बनतात.
बाजारात मिळणाऱ्या लोणच्यांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि पाम ऑइल किंवा निकृष्ट दर्जाचे तेल वापरले जाते, ज्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल वाढू शकते.
रोज लोणचे खाणे टाळा. खाणारच असाल तर जेवणात तोंडी लावण्यासाठी फक्त अर्धा छोटा चमचा लोणचे घ्या.
बाजारातील रासायनिक प्रिझर्व्हेटिव्ह्ज असलेले लोणचे खाण्याऐवजी घरी कमी मीठ आणि चांगल्या तेलात बनवलेले लोणचे खा.