Anuradha Vipat
कांदा हा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी, काही विशिष्ट लोकांसाठी त्याचे अतिसेवन नुकसानकारक ठरू शकते.
ज्यांना वारंवार ॲसिडिटीचा त्रास होतो, त्यांनी कच्चा कांदा खाणे टाळावे. कांद्यामुळे पोटातील आम्ल वाढते.
कांद्यामध्ये 'फ्रुक्टन्स' नावाचे कार्बोहायड्रेट असते, जे काहींना पचायला जड जाते. यामुळे गॅस, पोट फुगणे आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो
कांद्यामध्ये नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म असतात.
कांद्यामुळे रक्ताची गुठळी होण्याची प्रक्रिया संथ होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही शस्त्रक्रियेच्या किमान दोन आठवडे आधी कांदा खाणे कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
काही लोकांना कांद्याच्या संपर्काने किंवा सेवनाने त्वचेवर खाज, रॅशेस किंवा लालसरपणा येऊ शकतो.
उन्हाळ्यात कांदा खाणे थंड मानले जाते, पण त्याचे प्रमाण मर्यादित ठेवावे.