Anuradha Vipat
उशिरा जेवल्यामुळे अन्न नीट पचत नाही, ज्यामुळे गॅस, अपचन, आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.
रात्री उशिरा खाल्लेल्या अन्नातील उष्मांकाचा वापर शरीराकडून ऊर्जा म्हणून केला जात नाही. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढते.
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने पोटातील पाचक ॲसिड अन्ननलिकेत वरच्या दिशेने प्रवाहित होते.
उशिरा जेवल्यामुळे शरीर अन्न पचवण्याच्या कामात व्यस्त राहते. यामुळे शरीराला आणि मेंदूला गाढ विश्रांती मिळत नाही.
रात्री उशिरा खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यात अडथळा येतो
अपुऱ्या झोपेमुळे दुसऱ्या दिवशी चिडचिड होणे, थकवा जाणवणे आणि मानसिक तणाव वाढणे अशा समस्या उद्भवतात.
उशिरा जेवल्यामुळे ही प्रक्रिया विस्कळीत होते, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.