Anuradha Vipat
बिस्किटांचे अतिसेवन शरीरात अनेक गंभीर आजार निर्माण करू शकते.
बिस्किटांमध्ये असणारे मैदा, साखर आणि खराब फॅट्स आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात.
बिस्किटांमध्ये ट्रान्स फॅट असते. यामुळे शरीरात जळजळ वाढते, जी मल्टिपल स्केलेरोसिस, सांधेदुखी आणि इतर जुनाट आजारांना कारणीभूत ठरू शकते.
ट्रान्स फॅट आणि अतिप्रमाणामध्ये असणारे सोडियम शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल वाढवते यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
बिस्किटांना चवदार बनवण्यासाठी त्यात रिफाइंड शुगर आणि 'हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप' वापरले जाते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते .
मैद्यामध्ये फायबर अजिबात नसते आणि कॅलरीज खूप जास्त असतात. यामुळे अतिखाण्यामुळे वजन झपाट्याने वाढते.
फायबर नसलेली बिस्किटे आतड्यांना चिकटून राहतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता , गॅस आणि अपचनाचा त्रास होतो.