Anuradha Vipat
सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी चहा पिणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.
चहामध्ये असणारे कॅफिन आणि टॅनिन हे घटक रिकाम्या पोटी शरीरात गेल्यामुळे आरोग्यावर खालीलप्रमाणे विपरित परिणाम होतात.
उपाशीपोटी चहा प्यायल्याने पोटातील पाचक रसांचे संतुलन बिघडते.
चहातील टॅनिनमुळे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांचे नुकसान होते. यामुळे चयापचय क्रिया मंदावते
चहा हा 'लघवीचे प्रमाण वाढवणारा' असल्याने, तो उपाशीपोटी प्यायल्याने शरीरातील पाणी आणखी कमी होते .
सकाळी रिकाम्या पोटी चहा घेतल्याने शरीर अन्नातील लोह आणि कॅल्शियम यांसारखे महत्त्वाचे घटक शोषून घेऊ शकत नाही.
रिकाम्या पोटी कॅफिन वेगाने रक्तामध्ये मिसळते, ज्यामुळे मूड स्विंग्सचा त्रास होऊ शकतो.