Anuradha Vipat
ब्लॅक टी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असला, तरी तो पिण्याची एक योग्य पद्धत आहे.
जर ब्लॅक टी चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या वेळी प्यायला, तर त्याचे शरीराला फायद्यांऐवजी मोठे नुकसान होऊ शकते.
सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी ब्लॅक टी पिणे टाळावे. यातील 'टॅनिन'मुळे पोटात तीव्र ॲसिडिटी, गॅस, जळजळ किंवा मळमळ होऊ शकते.
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी किंवा डायबिटिज नियंत्रणासाठी ब्लॅक टी पीत असाल, तर त्यात पांढरी साखर घालणे पूर्णपणे बंद करा.
ब्लॅक टी मध्ये कॅफिन चे प्रमाण जास्त असते. दिवसातून ३ कपपेक्षा जास्त चहा प्यायल्याने चिडचिड होणे, डोकेदुखी, घबराट आणि हाय ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो.
कॅफिनमुळे मेंदू उत्तेजित होतो. त्यामुळे झोपण्याच्या किमान ४ ते ५ तास आधी ब्लॅक टी पिणे बंद करावे.
जेवण झाल्या झाल्या लगेच ब्लॅक टी पिऊ नये. ब्लॅक टी मधील टॅनिन हे अन्नातील लोह शरीरात शोषून घेण्यास अडथळा निर्माण करतात.