Anuradha Vipat
श्रावण महिन्यात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी नियमित जलाभिषेक करणे, उपवास धरणे आणि मंत्रजाप करणे हे सर्वात प्रभावी मानले जाते.
श्रावण हा शिवशंकराचा अत्यंत प्रिय महिना असून या काळात केलेल्या साध्या उपायांनीही भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात.
रोज सकाळी तांब्याच्या पात्रातून शिवलिंगावर स्वच्छ जल किंवा गंगाजल अर्पण करावे.
श्रावणी सोमवारी दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र करून पंचामृत अभिषेक करावा.
श्रावणातील प्रत्येक सोमवारी मनोभावे उपवास करावा. यामुळे सुख, समृद्धी आणि इच्छित वर प्राप्ती होते.
या महिन्यात 'शिवलीलामृत' या ग्रंथाचे वाचन किंवा ११ व्या अध्यायाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
शिवमंदिरात किंवा घरी महादेवाच्या मूर्तीसमोर बसून रोज किमान १०८ वेळा 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करावा.