Anuradha Vipat
खसखस हा आपल्या स्वयंपाकघरातील असा एक पदार्थ आहे जो जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो.
यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, पोटॅशियम आणि फायबर यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
खसखसमध्ये मॅग्नेशियम असते, जे शरीरातील स्ट्रेस हार्मोन कमी करून मानसिक ताण दूर करते आणि अनिद्रेचा त्रास कमी करते.
यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्टतेचा त्रास दूर होतो आणि पचन संस्था निरोगी राहते.
खसखसमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.
यातील ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि निरोगी फॅट्स शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतात.
खसखसमधील अँटीऑक्सिडंट्स आणि झिंक त्वचा तजेलदार बनवतात आणि केसांमधील कोंडा कमी करण्यास मदत करतात.