Anuradha Vipat
पालेभाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि जीवनसत्त्वे, खनिजे तसेच फायबरचा उत्तम स्त्रोत मानल्या जातात.
पालक, माठ, राजगिरा आणि अंबाडी यांसारख्या पालेभाज्यांमध्ये ऑक्झॅलेटचे प्रमाण खूप जास्त असते. जर या भाज्या रोज आणि मोठ्या प्रमाणात खाल्ल्या तर किडनी स्टोन तयार होण्याचा धोका वाढतो.
पालेभाज्यांमध्ये फायबर भरपूर असते. यामुळे पोट फुगणे, गॅस होणे, पोटात पेटके येणे आणि डायरिया सारखे त्रास होऊ शकतात.
पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन केचे प्रमाण खूप जास्त असते. व्हिटॅमिन के शरीरात रक्त गोठवण्याचे काम करते.
पालेभाज्यांमध्ये ऑक्झॅलेट्स आणि फायटेट्स नावाचे घटक असतात. यामुळे शरीर ही खनिजे शोषून घेऊ शकत नाही, ज्याला 'पोषक तत्वांची कमतरता' म्हटले जाते.
भाज्या कच्च्या किंवा अति प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील आयोडीनच्या शोषणात अडथळा येतो आणि थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात बिघाड होऊ शकतो.