Fairness Cream : फेअरनेस क्रिमबाबत धक्कादायक अहवाल, किडनीच्या गंभीर होतील समस्या

sandeep Shirguppe

फेअरनेस क्रिम

भारतीय बाजारपेठेत सर्वाधीत त्वचेसाठी क्रिमची विक्री होते, यामुळे फेअरनेस क्रीमची बाजारपेठ नेहमी तेजीत असते.

Fairness Cream | agrowon

फेअरनेस क्रिमवर संशोधन

परंतु एका संशोधनानुसार फेअरनेस क्रीमचा सतत वापर केल्याने किडनीच्या समस्या वाढत असल्याचा अहवाल समोर आला आहे.

Fairness Cream | agrowon

फेअरनेस क्रिमचा धोका

केरळच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी हे संशोधन केले माहिती मेडिकल जर्नल किडनी इंटरनॅशनल या नियतकालिकेने प्रसिद्ध केली.Fairness Cream

Fairness Cream | agrowon

रासायनिक घटक

संशोधनानुसार, या क्रीममध्ये पारा हा रासायनिक घटक मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे किडनी खराब होते.

Fairness Cream | agrowon

मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी

फेअरनेस क्रीम्सच्या वाढत्या वापरामुळे, मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी (एमएन) चे रुग्ण वाढत आहेत.

Fairness Cream | agrowon

नेफ्रोटिक सिंड्रोम

एमएन हा एक ऑन्टोइम्युन आजार असून, यात नेफ्रोटिक सिंड्रोम होतो.

Fairness Cream | agrowon

मेंदूमध्ये रक्ताची गुठळी

संशोधनादरम्यान रुग्णामध्ये सेरेब्रल व्हेन थ्रोम्बोसिस देखील आढळला. यामध्ये मेंदूमध्ये रक्ताची गुठळी जमा होते.

Fairness Cream | agrowon

फिल्टरिंग क्षमतेस हानी पोहोचते

संशोधकांच्या मते, क्रीममधील पारा त्वचेतून किडनीपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे किडनीची फिल्टरिंग क्षमता खराब होते.

Fairness Cream | agrowon

जुलै २०२१ आणि सप्टेंबर २०२३

संशोधकात जुलै २०२१ आणि सप्टेंबर २०२३ यादरम्यान मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथीच्या २२ प्रकरणांची तपासणी करण्यात आली.

Fairness Cream | agrowon

लघवीमध्ये फेस वाढणे

केरळमधील एका रुग्णालयात, रुग्णांमध्ये थकवा, सौम्य सूज आणि लघवीमध्ये फेस वाढणे ही लक्षणे दिसून आली.

Fairness Cream | agrowon