sandeep Shirguppe
सकाळी उठल्यानंतर चहासोबत आपण बेकरी पदार्थ हमखास खात असतो.
तुम्हाला माहितीये का? तुम्ही खात असलेले बेकरी पदार्थ तुमची ब्लड शुगर लेवल अनियंत्रीत करू शकतात.
ज्यांना मधुमेह आहे त्यांनी चुकूनही चहा-टोस्ट किंवा साधा ब्रेड खाऊ नये.
मुळात विशेषतः साखरेचा चहा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकतो.
चहामध्ये कॅफेन असून ते शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव काही काळासाठी कमी करतं.
टोस्टमध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि साखर शरीरात ग्लुकोजमध्ये लवकर रूपांतरित होतात.
चहा आणि टोस्ट हे केवळ ऊर्जा देतात, पण आवश्यक पोषक तत्वे देत नाहीत, ज्यामुळे कुपोषण होऊ शकते.
टोस्टमुळे पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे अपचन आणि इतर समस्या येऊ शकतात.