sandeep Shirguppe
पिस्ता चवीला उत्तम असतो त्याचबरोबर रोज सकाळी पिस्ता खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात.
पिस्त्यामध्ये फायबर्स, कार्ब्स, एमिनो एसिड, थियामीन व्हिटॅमीन असतात.
तुम्ही सकाळी उठल्यानंतर रात्री भिजवलेल्या पिस्त्याचे सेवन केले तर पुरेपूर फायदे मिळतील.
पिस्त्याचे सेवन सकाळी रिकाम्यापोटी केल्यास डोळ्याचं आरोग्य चांगले राहते.
पिस्त्यातील व्हिटामीन बी-६ डोपामाईन तयार करण्यासाठी महत्वाचा असतो याने झोप आणि एकाग्रता वाढते.
पिस्त्यामधील असणारे पोषक तत्व महिलांना गर्भावस्थेत फायदेशीर ठरतात.
पिस्त्यात प्रोटिन्स असतात. नवीन रक्ताच्या पेशींची वाढ होण्यास आणि मासंपेशींच्या विकासात मदत होते.
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर हेल्दी स्नॅक्स म्हणून पिस्त्याचा आहारात समावेश करू शकता.