Elephant Safari : भारतातील 'ही' आहेत हत्तींसाठी प्रसिध्द अभयारण्ये

Mahesh Gaikwad

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या काझीरंगा या अभयारण्यात हत्तींचे मोठे कळपही पाहायला मिळतात. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेले हे उद्यान जैवविविधतेसाठी ओळखले जाते.

Elephant Safari | Agrowon

नागरहोळे राष्ट्रीय उद्यान, कर्नाटक

हे अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध असून, येथे जंगल सफारी करताना हत्तींचे मोठे कळप पाहता येतात. याशिवाय येथे वाघ आणि बिबटेही आढळतात.

Elephant Safari | Agrowon

पेरियार अभयारण्य, केरळ

केरळमधील पेरियार तलावाच्या आसपास हत्तींचे मोठे कळप पाहायला मिळतात. शांत पाण्यात नौकाविहार करत तुम्ही हत्ती निरीक्षणाचा आनंदही घेवू शकता.

Elephant Safari | Agrowon

राजाजी राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

उत्तर भारतातील हे सर्वात प्रसिद्ध हत्ती अभयारण्य असून येथे हत्तींसोबतच बिबटे आणि विविध पक्ष्यांच्या प्रजातीही पाहता येतात.

Elephant Safari | Agrowon

बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, कर्नाटक

हे अभयारण्य हत्ती, वाघ आणि अस्वलांसाठी प्रसिद्ध असून सफारीसाठी उत्तम ठिकाण आहे. येथे हत्तींसाठी संरक्षित क्षेत्र आहे.

Elephant Safari | Agrowon

सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान, ओडिशा

हत्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या या उद्यानात धबधबे आणि दाट जंगल पाहायला मिळते. हत्ती निरीक्षणासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

Elephant Safari | Agrowon

मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम

हे अभयारण्य UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. येथे हत्ती, गेंडे आणि वाघ मोठ्या प्रमाणात आहेत.

Elephant Safari | Agrowon

सतपुडा राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश

मध्य भारतातील हे अभयारण्य जंगल हत्ती, बिबटे, अस्वल आणि अन्य वन्यजीवांसाठी ओळखले जाते. येथे जंगल सफारीत हत्ती पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो.

Elephant Safari | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....