sandeep Shirguppe
देशाचे माजी कृषी मंत्री महाराष्ट्राचे ४ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार यांनी ८३ वर्षे पूर्ण केली. त्यांचे कृषी क्षेत्रातील मोठे योगदान आहे.
शरद पवारांनी २००४ साली देशाच्या शेतीक्षेत्राचा कासरा हाती घेऊन गहू, साखर, तांदूळ यासह अन्य महत्वाच्या खाद्य पदार्थात पवारांनी भारताला स्वयपूर्ण बनवलं.
२०१४ पर्यंत म्हणजे एका दशकात गहू, तांदूळ, कापूस, सोयाबीन या सर्व पिकांच्या हमीभावात दुप्पटीपेक्षा अधिक वाढ शरद पवार यांनी केली.
अन्नधान्याच्या हमीभावात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले अन् देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला.
शरद पवारांनी कृषिभवनचा निरोप घेईपर्यंत भारत जगामध्ये तांदळाचा प्रथम क्रमांकाचा निर्यातदार देश बनला तर गहू निर्यातीत दुसऱ्या स्थानावर होता.
शरद पवारांनी वेळोवेळी निर्यातीस पूरक अशी धोरणामुळे २००४ ते २०१४ या दहा वर्षात शेती व संलग्न उत्पादनांची निर्यात ७.५ अब्ज डॉलरवरून तब्बल ४२.८४ गेली.
शरद पवारांनी ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकले आहे अशांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ६० हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ करून घेतले.
शेतीविषयक धोरणांमुळे ग्रामीण भागात आर्थीक संपन्नता आली यामुळे बजाज, हिरो, होंडा या मोटरसायकल कंपन्यांचा खप वाढल्याचे दिसून आले.
गहू, तांदूळ याप्रमाणेच भाज्या आणि फळांचं उत्पादन ४५.२ दशलक्ष टनांवरून ८९ दशलक्ष टनांपर्यंत गेलं.
पवारांनी केंद्रीय कृषिमंत्री म्हणून केलेल्या कामाचा लेखाजोखा यापेक्षाही मोठा असल्याने निवडक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न