Anuradha Vipat
दिवाळीसाठी खुसखुशीत आणि स्वादिष्ट शंकरपाळी बनवण्याच्या सोप्या पद्धती आम्ही खालीलप्रमाणे आहेत ज्या नक्कीच तुमच्या कामी येतील.
तुम्ही गोड आणि तिखट अशा दोन्ही प्रकारच्या खुसखुशीत आणि स्वादिष्ट शंकरपाळ्या बनवू शकता.
मैदा ४ कप, साजूक तूप - १ कप, साखर - १ कप, दूध - १ कप, वेलची पूड - १ चमचा,मीठ - १ चिमूटभर, तळण्यासाठी तेल किंवा तूप.
एका भांड्यात तूप, साखर आणि दूध एकत्र गरम करुन साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत रहा. मिश्रण गरम झाल्यावर ते थोडे थंड करा.
एका भांड्यात मैदा, वेलची पूड आणि चिमूटभर मीठ एकत्र करून घ्या. दुधाचे मिश्रण मैद्यामध्ये घाला आणि घट्टसर पीठ मळून घ्या. पीठ २०-३० मिनिटे झाकून ठेवा.
पिठाचे छोटे गोळे करून जाडसर पोळी लाटून घ्या. चाकूने शंकरपाळी चौकोनी आकारात कापा.
शंकरपाळी मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या. शंकरपाळी पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
अशा पद्धतीने तुमची मऊ ,गोड आणि खुशखुशीत शंकरपाळी खाण्यासाठी तयार आहे.