Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतांनुसार, शनीची साडेसाती किंवा जीवनातील इतर संकटे ही व्यक्तीच्या पूर्वकर्माची फळे आणि ग्रहांच्या स्थितीमुळे येतात.
साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी आणि संकटांतून मुक्ती मिळवण्यासाठी खालील सोपे आणि प्रभावी उपाय अत्यंत उपयुक्त ठरतात.
साडेसातीच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी हनुमान चालिसा किंवा 'बजरंग बाण' चा रोज पाठ करा.
दररोज किंवा किमान शनिवारी संध्याकाळी शनी मंत्राचा १०८ वेळा जप करा.
शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
शनिवारी पिंपळाला प्रदक्षिणा घाला. यामुळे पित्रू दोष आणि शनी दोष दोन्ही शांत होतात.
शनिवारी काळे तीळ, काळे उडीद, मोहरीचे तेल किंवा लोखंडी वस्तू दान केल्याने साडेसातीचा प्रभाव कमी होतो