Anuradha Vipat
चहा आपल्या जगण्याचा महत्त्वाचा भाग आहे, पण तो चुकीच्या पद्धतीने पिण्यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
चहा पिण्यची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी नाश्ता केल्यानंतर किमान ४5 मिनिटे ते १ तासाने.
दुपारच्या जेवणानंतर दोन तासांनी चहा प्यायल्याने सुस्ती दूर होते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत हलका नाश्ता करून चहा पिणे सुरक्षित मानले जाते.
सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा कधीही पिऊ नये.
जेवताना लगेच चहा पिणे टाळावे. चहातील टॅनिन अन्नातील लोह आणि कॅल्शियम शरीरात शोषून घेण्यास अडथळा निर्माण करतो.
रात्री झोपण्यापूर्वी किमान ४ तास आधी चहा बंद करावा. यातील कॅफिनमुळे झोप न येण्याचा त्रास होऊ शकतो.