sandeep Shirguppe
तिळातील पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स, ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम शरिरासाठी पोषक असतात.
तिळाचे हृदयापासून त्वचेपर्यंत कुठकुठले फायदे आहेत, हे जाणून घेऊया.
तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात.
दिवसातून एकदा तुम्ही मोठा चमचाभर तीळ खाल्लेत, तर तुमचे दातही मजबूत होतील.
तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकारशक्तीही वाढते.
फुफ्फुस, पोट, गर्भाशय, स्तन, रक्त (ल्युकेमिया) यांचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी करतात.
त्वचा मुलायम राहण्यासाठीही तिळ उपयुक्त असतात. तिळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते.
ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी तीळ कमी प्रमाणात खावेत किंवा खाऊच नयेत.