Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार काळे आणि पांढरे दोन्ही तीळ पूजेसाठी आणि दान करण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
धार्मिक विधींमध्ये पूजेसाठी आणि दान करण्यासाठी काळे तीळ सर्वात जास्त श्रेष्ठ मानले जातात.
पितरांचे तर्पण किंवा श्राद्ध कर्मामध्ये केवळ काळ्या तिळांचाच वापर केला जातो.
शनी देवाची पूजा, साडेसातीचे उपाय किंवा शनी शिंगणापूरसारख्या ठिकाणी अभिषेक करण्यासाठी काळे तीळ वापरणे अत्यंत फलदायी असते.
देवांसाठी आणि विशेषतः महादेवाला अर्पण करण्यासाठी काळ्या तिळांना प्राधान्य दिले जाते.
खाण्यासाठी आणि नैवेद्यासाठी पांढरे तीळ शुभ मानले जातात.
शनी, राहू आणि केतू या ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी काळ्या तिळाचे दान करणे हा सर्वोत्तम उपाय आहे.