Rock Pigeon : गच्चीत येणाऱ्या पारव्यांपासून सावधान ; होईल फुप्फुसाचा गंभीर आजार

Mahesh Gaikwad

कबुतर

कबुतरासारखाच दिसणारा पारवा हा पक्षी कोलंबिडी पक्षीकुलातील पक्षी आहे. कबुतर आणि पारव्यामध्ये केवळ रंग सोडला तर हे दोन्ही पक्षी दिसायला सारखेच दिसतात.

Rock Pigeon | Agrowon

रानटी पारवे

रानटी पारवे खडकाळ डोंगराळ आणि उघड्या प्रदेशात आढळतात. तर, शहरांमध्येही माणसाळलेले पारवे पडक्या इमारती, मोठ्या इमारतींमध्ये सहज आढळतात.

Rock Pigeon | Agrowon

संदेश वहन

असे म्हणतात की, पूर्वीच्या काळी संदेश वहनासाठी कबुतरांचा वापर केला जायचा. पण कबुतराच्या कुलातील पारवा हा पक्षी गंभीर आजार पसरवत आहे.

Rock Pigeon | Agrowon

पारव्यांचा त्रास

मोठ्या शहरांमध्ये इमारतींच्या बाल्कनीमध्ये पारवे येतात. अनेकजण या पारव्यांच्या त्रासाला वैतागलेले पाहायला मिळतात. पण गच्चीत येणारे हे पारवे गंभीर आजारासाठी कारणीभूत ठरतात.

Rock Pigeon | Agrowon

फुप्फुसाचा संसर्ग

गच्चीत येणारा हा पारवा पक्षी फुप्फुसाच्या संसर्गासारखा गंभीर आजार परविणारा पक्षी आहे.

Rock Pigeon | Agrowon

पारव्यांची विष्ठा

पारव्यांच्या विष्ठेमार्फत या आजाराता फैलाव होतो. पारव्यांच्या विष्ठेमध्ये क्लेमीजिया सीटीकी नावाचा धोकादायक जीवाणू आढळतो.

Rock Pigeon | Agrowon

श्वासावाटे फुप्फुसात

हा जीवाणू हवेत मिसळून श्वासावाटे आपल्या फुप्फुसामध्ये प्रवेश करतो. यामुळे फुप्फुसाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

Rock Pigeon | Agrowon