Anuradha Vipat
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रामध्ये सांगितले आहे की कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी स्वतःला ३ प्रश्न आवर्जून विचारले पाहिजेत.
कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्याचा हेतू स्पष्ट असावा.
तुम्ही ते काम केवळ कोणाचे तरी पाहून करत आहात की ती तुमची गरज किंवा आवड आहे? जर तुमचा हेतू स्पष्ट असेल तर वाटेत कितीही अडचणी आल्या तरी तुमची जिद्द ढळणार नाही.
काम पूर्ण झाल्यावर किंवा ते करत असताना त्याचे तुमच्या आयुष्यावर, कुटुंबावर आणि आर्थिक स्थितीवर काय परिणाम होतील, याचा विचार करा.
हा प्रश्न स्वतःच्या क्षमतेवर शंका घेण्यासाठी नाही, तर स्वतःच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आहे.
काम पूर्ण करण्यासाठी लागणारे कौशल्य, साधनसामग्री आणि वेळ तुमच्याकडे आहे का? स्वतःच्या सामर्थ्याचा आणि कमकुवतपणाचा विचार करून पाऊल उचला.
अपयश आले तर माझा 'प्लॅन बी' काय आहे? चाणक्य नीतीनुसार, शहाणा माणूस नेहमी संकटासाठी तयार असतो.