Anuradha Vipat
तुम्हाला सेल्फ मेकअप करायला आवडत असेल, तर काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरच्या घरी पार्लरसारखा लूक मिळवू शकता.
मेकअप करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा , टोनर लावा आणि चांगल्या मॉइश्चरायझरने मालिश करा.
मेकअप जास्त काळ टिकण्यासाठी आणि त्वचेवरील छिद्रे लपवण्यासाठी प्रायमर लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे किंवा चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी तुमच्या स्किन टोननुसार कन्सीलर लावा.
फाउंडेशन नेहमी तुमच्या मानेच्या रंगाशी मॅच होणारे निवडा.
फाउंडेशन आणि कन्सीलर लावल्यानंतर ते 'क्रीझ' होऊ नये म्हणून लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडरने सेट करा.
गालांच्या वरच्या भागावर हलके ब्लश लावा आणि नाकाचे टोक व गालांच्या हाडांवर हायलाइटर लावा. ओठांना लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप लायनरने आकार द्या.