Anuradha Vipat
सध्या गुगलच्या ‘जेमिनी नॅनो बनाना'ने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
जेमिनी नॅनो बनाना 2025 मधील सर्वाधिक लोकप्रिय AI ट्रेंडपैकी एक बनले आहे.
आता जेमिनी नॅनो बनानाबद्दल आपल्या फोटोंची सुरक्षितता आणि गोपनीयता याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
एकदा अपलोड केलेले फोटो एआय टूलच्या मदतीने गैरवापर किंवा डीपफेकसाठी वापरले जाऊ शकतात अशी शंका निर्माण होत आहे
आता गुगलने या समस्येवर उपाय म्हणून जेमिनी इमेजमध्ये ‘सिंथआयडी' नावाचे एक अदृश्य डिजिटल वॉटरमार्क वापरले आहे
या वॉटरमार्कचा उद्देश एआय-जनरेटेड कंटेंट ओळखणे हा आहे.
हे वॉटरमार्क डोळ्यांना दिसत नाही पण विशिष्ट डिटेक्शन टूल्सच्या मदतीने हे ओळखता येते