Anuradha Vipat
घरी हॉटेलसारखी आणि चायनीज गाडीवर मिळते तशी चमचमीत, तिखट आणि लज्जतदार शेजवान चटणी बनवणे अतिशय सोपे आहे.
२० ते २५ सुक्या लाल मिरच्या, बारीक चिरलेला लसूण आणि अर्धा कप बारीक चिरलेले आले, डार्क सोया सॉस आणि रेड चिली सॉस, टोमॅटो केचअप ,व्हिनेगर , साखर , चवीनुसार मीठ आणि अर्धा कप तेल.
सुक्या लाल मिरच्यांचे देठ काढून घ्या. एका भांड्यात पाणी उकळून त्यात या मिरच्या १० ते १५ मिनिटे चांगल्या शिजवून घ्या. मिरच्या थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची जाडसर पेस्ट तयार करा.
तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण आणि आले टाका. गॅस मध्यम ठेवून ते २ ते ३ मिनिटे परतून घ्या. यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेली लाल मिरचीची पेस्ट घाला आणि सर्व मिश्रण तेलात व्यवस्थित मिक्स करा.
मिरची चांगली शिजल्यावर त्यात डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर, चवीनुसार मीठ आणि १ छोटा चमचा साखर घाला.
चटणीच्या कडेने तेल सुटू लागले की समजावे तुमची शेजवान चटणी तयार आहे. गॅस बंद करा आणि चटणी पूर्णपणे थंड होऊ द्या.
चटणी पूर्णपणे थंड झाल्यावरच ती काचेच्या स्वच्छ आणि सुक्या एअर-टाईट बरणीत भरा.