Healthy Farali Snacks : साबुदाणा खिचडीला म्हणा बाय-बाय; यंदा उपवासाला खा हे पौष्टिक पदार्थ

Anuradha Vipat

साबुदाण्याची खिचडी किंवा वडे

नवरात्रीच्या उपवासाला बहुतेक घरांमध्ये साबुदाण्याची खिचडी किंवा वडे आवर्जून बनवले जातात.

Healthy Farali Snacks | agrowon

जास्त आणि फायबर

साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आणि फायबर खूप कमी असते, ज्यामुळे उपवासात बद्धकोष्ठता, ॲसिडिटी किंवा सुस्ती येऊ शकते.

Healthy Farali Snacks | Agrowon

भगरीची खिचडी किंवा थालीपीठ

भगर हे फायबर, प्रोटीन आणि लोहाचा उत्तम स्त्रोत आहे. हा एक ग्लुटेन-फ्री पर्याय असून पचायला अत्यंत हलका असतो. साबुदाण्याऐवजी भगरीचा मऊ भात, आमटी किंवा भगरीचे पीठ वापरून खमंग थालीपीठ बनवू शकता.

Healthy Farali Snacks | Agrowon

मखाणा चाट किंवा खीर

मखाणे हलके तूप, जिरे आणि सैंधव मीठ घालून भाजून घ्या. तुम्ही याचा चवदार मखाणा चाट किंवा दुधातील मखाणा खीर बनवून खाऊ शकता.

Healthy Farali Snacks | Agrowon

राजगीऱ्याचा शिरा किंवा लाडू

राजगीऱ्याच्या पिठाची पुरी, चपाती किंवा शिरा बनवता येतो. बाजारात मिळणारे राजगीऱ्याचे लाडू किंवा चिक्की हा प्रवासात खाण्यासाठी एक झटपट आणि हेल्दी पर्याय आहे.

Healthy Farali Snacks | agrowon

रताळ्याची चाट किंवा हलवा

रताळे उकडून, त्यावर थोडे जिरे पावडर, लिंबू रस आणि सैंधव मीठ टाकून स्वादिष्ट चाट बनवू शकता.

Healthy Farali Snacks | agrowon

शिंगाड्याच्या पिठाचे धिरडे

शिंगाड्याच्या पिठात थोडे ताक, हिरवी मिरची आणि जिरे घालून छान मऊ धिरडे बनवता येतात.

Healthy Farali Snacks | Agrowon

Navratri Bhog Malpua Recipe : देवी कुष्मांडाला प्रिय असणारा रसाळ मालपुआ नैवेद्य; पाहा सोपी

Navratri Bhog Malpua Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...