Anuradha Vipat
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाला मालपुआचा नैवेद्य दाखवला जातो.
असे मानले जाते की देवीला मालपुआ अर्पण केल्याने बुद्धी, यश आणि निर्णयक्षमता वाढते.
गव्हाचे पीठ किंवा मैदा,रवा (बारीक सूजी),दूध किंवा खवा (मावा),साय,बडीशेप पावडर,वेलची पावडर,तूप किंवा तेल.
साखर,पाणी,केशर,वेलची पावडर,बदाम-पिस्ता काप.
गव्हाचे पीठ, रवा, बडीशेप पावडर आणि वेलची पावडर एकत्र मिक्स करा. यात २ चमचे साय टाका. त्यानंतर कोमट दूध हळूहळू घालत मिश्रण चमच्याने ढवळून घ्या. मिश्रण २० ते ३० मिनिटे झाकून बाजूला ठेवा.
साखर आणि पाणी एकत्र करून गॅसवर उकळायला ठेवा. केशर आणि वेलची पावडर टाका. पॅनमध्ये तूप किंवा तेल मध्यम गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर, डावाने मिश्रणाचा एक छोटा भाग पॅनच्या मधोमध ओता. मालपुआ दोन्ही बाजूंनी हलका सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
तळून घेतलेला गरम मालपुआ लगेचच कोमट साखरेच्या पाकात टाका. मालपुआ पाकात २ ते ३ मिनिटे राहू द्या, जेणेकरून तो पाक चांगला शोषून घेईल. त्यानंतर मालपुआ पाकातून बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवा आणि वरून बदाम-पिस्त्याचे काप टाकून सजवा.