Mahesh Gaikwad
वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या आणि फाईन लाईन्स म्हणजेच हलक्या रेषा दिसायला सुरूवात होते.
महिला आपल्या सौंदर्याबाबत खूपच जागरूक असतात. विशेषत: चेहऱ्यावरील सुरकुत्यांबाबत. आज आपण चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत.
मध आणि दही यामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि मॉइश्चुरायझिंग गुणधर्म असतात. या दोन्हीचे मिश्रण करून चेहऱ्यावर लावून काही वेळाने टाका. यामुळे नक्कीच फरक जाणवेल.
कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला हायड्रेट करून थंडावा देते. तसेच कोलेजन निर्मितीही वाढवते.
दररोज चेहऱ्यावर कोरफडीचा गर २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर तोंड धुवून टाका.
चेहरा मॉइश्चरायझ आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी नारळ तेल उपयुक्त आहे. रात्री झोपण्यापूर्वी हलकेच चेहऱ्यावर नारळ तेलाने मसाज केल्याने फरक जाणवेल.
चेहऱ्यावरील सुरकुत्यांच्या समस्येसाठी तुम्ही केळीचे मास्क करून लावू शकता.यामुळे सुरकुत्या आणि फाइन लाइन्स कमी होतात.
दररोज पुरेशी झोप घ्या. अपुऱ्या झोपेचा परिणाम थेट चेहऱ्यावर दिसून येतो. तसेच तणावामुळेही त्वचेवर परिणाम होतो.