Mahesh Gaikwad
बदलेली लाईफस्टाईल आणि खाण्याच्या पध्दतींमुळे तरूण मुला-मुलींमध्ये चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळ्या डागाची समस्या दिसून येते.
चेहऱ्यावर पिंपल्स आणि काळ्या डागांमुळे सुंदरता झाकोळली जाते. पण कोरियन स्किन केअर टीप्स फॉलो करून तुमची पिंपल्सची समस्या दूर होवू शकते.
कोरियन स्किन केअर चेहऱ्यावरील मुरूम, काळे डाग आणि तेलकटपणा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल.
दिवसातून कमीतकमी दोन-तीन वेळा चेहरा स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
जर तुमचा चेहरा तेलकट असेल, तर चेहऱ्यावर ऑईल बेस्ड शीट मास्क लावा. यामुळे चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होईल.
चेहरा हायड्रेटेड ठेवण्यासाठी चेहऱ्यावर सिरम लावा. यामुळे त्वचा रुक्ष व कोरडी पडणार नाही.
चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळ्या डागांसाठी घरीच तयार केलेला फेसमास्क लावू शकता.
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून मॉइश्चुरायझर लावा, यामुळे त्वचा मुलायम होईल. ही माहिती सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.