Mahesh Gaikwad
सेबम नावाचे तेल जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे त्वचेवर तेलकटपणा दिसतो. यामुळे मुरुम, ब्लॅकहेड्स यासारख्या समस्या उद्भवतात.
काही घरगुती उपाय केल्यास त्वचेवरील तेलकटपणा कमी करता येतो. पाहूयात याचीच माहिती.
सोयाबीन बारीक करून त्याची पावडर तयार करा. यामध्ये थोडे पाणी घालून तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर लावून धुवून टाका.
बेसन पीठ, चंदन पावडर आणि हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि १०-१५ मिनिटांनी धुवून टाका.
तेलकट त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर लावा. यामुळे तेलकट त्वचेची समस्या बऱ्यचा अंशी कमी होते.
रात्रीच्यावेळी कोरफडीचा गर लावल्यामुळे चेहरा मॉइश्चुरायज होतो आणि चेहरा उजळतो.
तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती आणि गुलाब जल एकत्र करून लावल्यास फायदा होतो. यामुळे त्वचेमध्ये तेल कमी प्रमाणात तयार होते.
त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी मध, हळद आणि कोरफडीचा फेसपॅक एकत्र करून लावल्यास फायदा होतो.