Digestive System Tips : पचनशक्ती कमजोर झालीये? मग आजच सुरू करा हे घरगुती उपाय; अन्न लोखंडासारखे पचेल!

Anuradha Vipat

पचनशक्ती

पचनशक्ती कमजोर झाल्यास शरीराला खाल्लेल्या अन्नातील पोषक घटक मिळत नाहीत.

Digestive System Tips | Agrowon

'मंदाग्नी'

गॅस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि सतत थकवा जाणवणे अशा समस्या सुरू होतात. आयुर्वेदात कमजोर पचनशक्तीला 'मंदाग्नी' म्हटले जाते.

Digestive System Tips | Agrowon

जेवण्यापूर्वी आले आणि सैंधव मीठ

जेवणाच्या ५ ते १० मिनिटे आधी आल्याचा एक लहान तुकडा आणि त्यावर थोडे सैंधव मीठ लावून चघळा.

Digestive System Tips | agrowon

जेवणानंतर ओवा आणि कोमट पाणी

दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर अर्धा चमचा ओवा थोड्या कोमट पाण्यासोबत चावून खा.

Digestive System Tips | Agrowon

ताकाचे सेवन

दुपारच्या जेवणात १ ग्लास ताज्या ताकामध्ये भाजलेली जिरे पूड आणि काळे मीठ टाकून प्या.

Digestive System Tips | Agrowon

जिरे, धणे आणि बडीशेपचा काढा

१ ग्लास पाण्यात अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धणे आणि अर्धा चमचा बडीशेप टाकून उकळवून घ्या. पाणी अर्धे झाल्यावर ते गाळून चहासारखे कोमट प्या.

Digestive System Tips | Agrowon

हिंगाची गोळी

जर पोट सतत फुगत असेल, तर जेवणानंतर अगदी थोडा हिंग कोमट पाण्यासोबत घेतल्यास पचनक्रिया गतिमान होते.

Digestive System Tips | agrowon

Snake Plant Health Benefits : स्नेक प्लांटचे फायदे: घरातील विषारी वायू शोषून हवा शुद्ध करणारे 'हे' नॅचरल एअर प्युरिफायर नक्की लावा!

Snake Plant Health Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...