Foot Odor Remedies: पायांच्या दुर्गंधीला करा राम-राम! हे ६ घरगुती उपाय करून पाहा...

Sainath Jadhav

मीठ आणि लिंबू पाणी

मीठ आणि लिंबू पाणी पायांचा घाम आणि दुर्गंधी कमी करतं, त्यासाठी कोमट पाण्यात १ चमचा मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. पाय १५ मिनिटे या पाण्यात भिजवा आणि स्वच्छ पुसून घ्या.

Salt & Lemon Water | Agrowon

चहाच्या पानांचं पाणी

चहाच्या पानांमुळे पायांचा घाम आणि वास कमी होतो. २ चहा पिशव्या १ लिटर गरम पाण्यात टाका. पाणी थोडं थंड झाल्यावर पाय २० मिनिटे त्यात भिजवा.

Tea leaf water | Agrowon

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा पायांवरील वास आणि जंतू कमी करतो. १ चमचा बेकिंग सोडा कोमट पाण्यात टाका. पाय १०-१५ मिनिटे त्यात भिजवा, मग स्वच्छ धुवा.

Baking soda reduces odor | Agrowon

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पायांवरील जंतू दूर करतो. अर्धा कप व्हिनेगर कोमट पाण्यात टाका. पाय १५ मिनिटे भिजवा आणि मऊ टॉवेलने पुसा.

Apple cider vinegar | Agrowon

लवंग तेल

लवंग तेल दुर्गंधी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. २-३ थेंब तेल कोमट पाण्यात टाका आणि पाय १० मिनिटे भिजवा किंवा थेट पायांवर लावून धुवा.

Clove oil | Agrowon

कॉर्नस्टार्च

कॉर्नस्टार्च पायांवरील ओलावा शोषते आणि घाम कमी करते. पाय धुवून कोरडे करा आणि कॉर्नस्टार्च पावडर बोटांमध्ये लावा.

Cornstarch absorbs moisture from the feet | Agrowon

महत्वाच्या टिप्स

पायांची दुर्गंधी आणि घाम टाळण्यासाठी - पाय रोज धुवून कोरडे ठेवा, सुती मोजे आणि हवेशीर बूट वापरा. रात्री बूट काढून पाय मोकळे ठेवा.

Important tips | Agrowon

Peaceful Sleep: रात्रीची शांत झोप हवीये? हे ८ उपाय नक्की वापरून पाहा!

Peaceful Sleep | Agrowon
अधिक माहितीसाठी...