Mahesh Gaikwad
ब्लोटिंग म्हणजे पोट फुगल्यासारखे किंवा भरल्यासारखे वाटणे. ही समस्या अनेकदा पोटात गॅस जमा झाल्यामुळे होते. ज्यामुळे पोटावर ताण येतो आणि अस्वस्थ वाटते.
ब्लोटिंग कमी करण्यासाठी सकाळी आणि जेवणानंतर थोडे कोमट पाणी प्या. यामुळे पचन सुधारते आणि गॅसही कमी होतो.
कोमट पाण्यामध्ये आले आणि लिंबाचा रस घालून ते प्या. पचनक्रिया सुधारते आणि पोटावरील ताण कमी होतो.
ब्लोटिंग कमी करण्यासाठी अर्धा चमचा ओवा आणि चिमूटभर मीठ कोमट पाण्यातून घ्या. यामुळे ब्लोटिंगच्या समस्येपासून आराम मिळतो.
पुदिना, बडीशेप आणि आले टाकून केलेला हर्बल चहा प्यायल्यामुळे पोटातील गॅश सुटतो आणि पोट हलके होते.
जेवणानंतर लगेच झोपण्यापेक्षा मोकळ्या हवेत १०-१५ मिनिटे चालल्यामुळे अन्न पचन सुरळीत होते.
काही पदार्थांमुळे जसे की, काही भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, कार्बोनेटेड पेये यामुळे काही लोकांना ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो.
ब्लोटिंग कमी करण्यासाठी तुम्ही पवनमुक्तासन, भुजंगासन आणि कपालभाती यासारखे योगासने करू शकतो. यामुळे पोटातील वायू सुटतो आणि पोट हलके होते.