Swarali Pawar
हळद लागवडीपूर्वी जमिनीची योग्य तयारी केल्यास उत्पादन आणि दर्जा दोन्ही वाढतात. योग्य मशागत आणि नियोजन हे यशस्वी लागवडीचं मुख्य रहस्य आहे.
मध्यम ते कसदार, निचरा होणारी काळी जमीन निवडा. सामू ६.५ ते ७.५ आणि किमान २०-२५ सेमी खोली आवश्यक आहे.
जमिनीत पाणी साचल्यास कंदकुज रोगाचा धोका वाढतो. खूप चिकण किंवा क्षारयुक्त जमीन टाळणे फायदेशीर ठरते.
मातीतील अन्नद्रव्यांची माहिती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे संतुलित खत व्यवस्थापन करता येते.
२५-३० सेमी खोल नांगरणी करून कडक थर फोडा. सबसोईलर किंवा तव्याचा नांगर वापरल्यास चांगला परिणाम मिळतो.
दुसरी नांगरणी आणि कुळवणी करून ढेकळे फोडा. तण आणि जुनी मुळे काढून टाकणे आवश्यक आहे.
हेक्टरी ३५-४० टन शेणखत किंवा कंपोस्ट मिसळा. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि ओलावा टिकतो.
१२० सेमी अंतरावर वरंबे तयार करून लागवड करा. ३०×३० सेमी अंतर ठेवून गड्डे पूर्ण झाकले जातील याची काळजी घ्या.
Groundwater Recharge: एल निनोमुळं यंदा पाऊस कमी; जमिनीत पाणी मुरवण्याची वेळ आली!