Swarali Pawar
चिखलात वाकून तण काढण्याचं काम कष्टाचं आणि वेळखाऊ असतं. पॅडी पॉवर वीडरमुळे कमी श्रमात आणि कमी वेळेत तण नियंत्रण करता येते.
भाताच्या दोन ओळींमध्ये २० ते ३० सेंमी अंतर असल्यास यंत्र सहज चालवता येते. एसआरआय, ड्रम सीडर किंवा यंत्राद्वारे लागवडीत हे अंतर ठेवता येते.
भातासाठी सिंगल रो, डबल रो आणि ब्रश कटरचलित सिंगल रो वीडर उपलब्ध आहेत. गरजेनुसार शेतकरी या यंत्रांपैकी योग्य यंत्राची निवड करू शकतात.
पॅडी पॉवर वीडरचे वजन सुमारे १७ किलो असून ते १.७५ अश्वशक्तीच्या इंजिनावर चालते. महिला किंवा पुरुष हे यंत्र उभे राहून सहज चालवू शकतात.
एक मजूर दिवसाला साधारण २ ते २.५ एकर क्षेत्राची डवरणी करू शकतो. यासाठी साधारण एकरी १ ते १.५ लिटर पेट्रोल लागते.
यंत्रामुळे कमी वेळेत मोठ्या क्षेत्रातील तण नियंत्रण करता येते. उभे राहून काम करता येत असल्याने पाठ आणि कमरेवरील ताणही कमी होतो.
रोपे चांगली रुजल्यानंतर साधारण २० दिवसांनी पहिली डवरणी करा. त्यानंतर ४५ ते ६० दिवसांनी दुसरी डवरणी केल्यास तण नियंत्रण चांगले होते.
डवरणीत कापलेले तण चिखलात गाडल्यास ते कुजून सेंद्रिय खत तयार होते. यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि अन्नद्रव्यांचा फायदा होऊन सुपीकता सुधारण्यास मदत होते.