Turmeric Fertilizer Schedule: हळदीसाठी फर्टिगेशनचे अचूक नियोजन; कोणत्या आठवड्यात किती खत?

Swarali Pawar

खतांचं नियोजन केलं का?

हळद हे ८ ते ९ महिन्यांचे पीक असून चांगल्या उत्पादनासाठी योग्य खत व्यवस्थापन गरजेचे आहे. ठिबकद्वारे खत देताना वाढीच्या अवस्थेनुसार मात्रा विभागून दिल्यास अन्नद्रव्यांचा चांगला उपयोग होतो.

Turmeric Fertigation | Agrowon

संपूर्ण हंगामात किती खत?

प्रति एकर संपूर्ण हंगामात ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश द्यावे. ही मात्रा एकाच वेळी न देता आठवड्यानुसार विभागून फर्टिगेशन करणे फायदेशीर ठरते.

Turmeric Fertigation | Agrowon

३ ते ४ आठवडे : उगवणीचा काळ

या काळात एकूण ६ किलो नत्र, ६ किलो स्फुरद आणि ३ किलो पालाश द्यावे. दर आठवड्याला ३ किलो नत्र, ३ किलो स्फुरद आणि १.५ किलो पालाश द्या.

Turmeric Fertigation | Agrowon

५ ते १४ आठवडे : शाकीय वाढ

हळदीच्या शाकीय वाढीसाठी या काळात ३० किलो नत्र, ९ किलो स्फुरद आणि ६ किलो पालाश द्यावे. दर आठवड्याला ३ किलो नत्र, ९०० ग्रॅम स्फुरद आणि ६०० ग्रॅम पालाश द्या.

Turmeric Fertigation | Agrowon

१५ ते २६ आठवडे : कंद वाढीचा काळ

कंदांच्या वाढीसाठी या १२ आठवड्यांत १५ किलो नत्र, ९ किलो स्फुरद आणि ९ किलो पालाश द्यावे. दर आठवड्याला १.२५ किलो नत्र, ७५० ग्रॅम स्फुरद आणि ७५० ग्रॅम पालाश द्या.

Turmeric Fertigation | Agrowon

२७ ते ३२ आठवडे : कंद तयार होण्याचा काळ

या सहा आठवड्यांत ९ किलो नत्र, ६ किलो स्फुरद आणि १२ किलो पालाश द्यावे. दर आठवड्याला १.५ किलो नत्र, १ किलो स्फुरद आणि २ किलो पालाश द्या.

Turmeric Fertigation | Agrowon

खत विभागून देण्याचा फायदा काय?

आठवड्यानुसार खत दिल्याने अन्नद्रव्यांचा अपव्यय कमी होतो आणि पिकाला गरजेनुसार पोषण मिळते. यामुळे हळदीच्या कंदांची वाढ चांगली होण्यास मदत होते.

Turmeric Fertigation | Agrowon

फर्टिगेशन करा!

ठिबकद्वारे विद्राव्य खते दिल्यास खत थेट पिकाच्या मुळांच्या परिसरात पोहोचते. वाढीच्या अवस्थेनुसार खतांचे नियोजन केल्यास हळदीचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

Fertilizer Management In Turmeric | Agrowon

Sucking Pest Control: मूग-उडीदमध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव! वेळीच करा नियंत्रण

Agrowon
अधिक माहितीसाठी..