Fertilizer Application: एकाच फेरीत 3 कामे! खत, तण नियंत्रण आणि भर लावणारे भन्नाट यंत्र

Swarali Pawar

आंतरमशागतीचा खर्च कमी करायचा?

खत देणे, तण काढणे आणि भर लावणे ही तीनही कामे आता एकाच फेरीत करता येतात. यामुळे वेळ, मजुरी आणि इंधनाची मोठी बचत होते.

Intercultivation Machine | Agrowon

कोणत्या पिकांसाठी उपयुक्त?

हे यंत्र मका, ऊस, बटाटा आणि रुंद ओळीतील पिकांसाठी उपयुक्त आहे. ५० सेंटीमीटरपेक्षा जास्त ओळीतील अंतर असलेल्या पिकांत याचा वापर करता येतो.

Intercultivation Machine | Agrowon

यंत्र कसे काम करते?

सर्वप्रथम यंत्र तण कापते आणि माती हलकी करते. त्यानंतर खत टाकून शेवटी झाडांना भर लावते.

Intercultivation Machine | Agrowon

खताचा अपव्यय होणार नाही

हे यंत्र खत झाडापासून ५ ते १० सेंटीमीटर अंतरावर पट्टा पद्धतीने देते. यामुळे अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होऊन खताची बचत होते.

Intercultivation Machine | Agrowon

भर लावण्याचाही फायदा

यंत्र झाडाभोवती सुमारे १० सेंटीमीटरपर्यंत माती चढवते. यामुळे झाडांना आधार मिळून मुळांची वाढ चांगली होते.

Intercultivation Machine | Agrowon

तण नियंत्रणही एकाच वेळी

खत देतानाच तण नियंत्रणाचे कामही पूर्ण होते. त्यामुळे स्वतंत्र आंतरमशागतीचा खर्च आणि वेळ वाचतो.

Intercultivation Machine | Agrowon

मोठे क्षेत्र कमी वेळेत तयार

या यंत्राची कार्यक्षमता सुमारे ८२ टक्के आहे. एका तासात सुमारे ०.५६ हेक्टर क्षेत्राची आंतरमशागत करता येते.

Intercultivation Machine | Agrowon

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

या ट्रॅक्टरचलित यंत्राची अंदाजे किंमत ५० हजार रुपये आहे. मोठ्या क्षेत्रातील मका, ऊस आणि रुंद ओळीतील पिकांसाठी हे यंत्र फायदेशीर ठरू शकते.

Intercultivation Machine | Agrowon

Pregnant Goat Care: पावसाळ्यात गाभण शेळ्यांची अशी घ्या काळजी! निरोगी करडांसाठी तज्ज्ञांचा सल्ला

gabhan Shelichi Kalji | Agrowon
अधिक माहितीसाठी..