Swarali Pawar
पावसाळ्यात गाभण शेळ्यांमध्ये आजार आणि गर्भपाताचा धोका वाढतो. थोडी काळजी घेतल्यास शेळी आणि करडे दोघांचेही आरोग्य चांगले राहते.
पावसाळ्यात हिरवा चारा भरपूर असला तरी तो एकदम जास्त खाऊ घालू नका. यामुळे पोटफुगी, अपचन आणि इतर पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
हिरव्या चाऱ्यासोबत सुका चारा, खुराक आणि खनिज मिश्रण द्या. व्यायच्या शेवटच्या आठवड्यांत योग्य खुराक दिल्यास करडाची वाढ चांगली होते.
शेळीला नेहमी स्वच्छ आणि ताजे पाणी पाजा. साचलेले किंवा खूप थंड पाणी देणे शक्यतो टाळा.
ओलसर गोठ्यात खुरांना जखमा होऊन संसर्गाचा धोका वाढतो. गोठा स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर ठेवणे खूप गरजेचे आहे.
गाभण शेळ्यांसाठी शक्यतो स्वतंत्र जागेची व्यवस्था करा. यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो आणि शेळीला कमी ताण येतो.
चारा खाणे बंद करणे, सुस्ती किंवा गर्भपाताची लक्षणे दिसू शकतात. अशी चिन्हे दिसताच त्वरित पशुवैद्यकांचा सल्ला घ्या.
गाभण शेळीला धावपळ किंवा लांब अंतर चालवू नका. योग्य काळजी घेतल्यास निरोगी करडे आणि चांगले उत्पादन मिळू शकते.