Swarali Pawar
तुडतुडे लहान, हिरवट-पिवळसर रंगाचे उडणारे किडे असतात. ते मोहोर व कोवळ्या भागातील रस शोषतात.
मोहोर, कोवळी पाने आणि लहान फळांवर हे जास्त दिसतात. सकाळी व संध्याकाळी त्यांचा प्रादुर्भाव वाढतो.
मोहोर सुकतो, काळवंडतो आणि गळून पडतो. यामुळे फळधारणा कमी होते.
तुडतुडे वाढल्यास उत्पादन ३० ते ६०% घटू शकते. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
मोहोर येण्यापूर्वी आणि बोंगे फुटताना फवारणी करावी. शिफारस केलेली कीटकनाशकेच वापरावीत.
१५ दिवसांच्या अंतराने तिसरी, चौथी व पाचवी फवारणी करावी. एकाच औषधाची सतत फवारणी टाळावी.
परागीभवनाच्या काळात फवारणी करू नये. मधमाशा व उपयुक्त किडींचे संरक्षण करावे.
वेळीच उपाय केल्यास मोहोर सुरक्षित राहतो. आंब्याचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही वाढते.