Swarali Pawar
उन्हाळा आणि दमट हवामानात डास व चिलटांची संख्या झपाट्याने वाढते. यामुळे जनावरांमध्ये डेंगूचा प्रादुर्भाव वाढून शेतकऱ्यांना नुकसान होऊ शकते.
जनावरांमध्ये होणारा हा एक विषाणूजन्य आजार आहे. याला ‘थ्री डे सिकनेस’ असे म्हणतात कारण लक्षणे २–३ दिवस तीव्र दिसतात.
गाय, म्हैस आणि बैल यांना हा आजार जास्त प्रमाणात होतो. जास्त दूध देणाऱ्या आणि तंदुरुस्त जनावरांमध्ये याची तीव्रता अधिक असते.
डास आणि कुलिकोइड्स चिलटे हे या आजाराचे मुख्य वाहक आहेत. साचलेले पाणी आणि दमट वातावरण यामुळे त्यांची वाढ जलद होते.
जनावरांना अचानक जास्त ताप येतो आणि अंग कडक होते. दूध उत्पादन कमी होते आणि जनावर सुस्त दिसते.
जनावर उठत नाही, लंगडते किंवा चारा-पाणी सोडते. नाक-डोळ्यातून पाणी येणे, पोटफुगी आणि सूजही दिसू शकते.
डेंगूमुळे दूध उत्पादनात ३० ते ५०% घट येऊ शकते. उपचार खर्च वाढतो आणि काही वेळा मृत्यूही होऊ शकतो.
गोठ्याभोवती पाणी साचू देऊ नका आणि स्वच्छता ठेवा. लक्षणे दिसताच तात्काळ पशुवैद्यांचा सल्ला घ्या.