Swarali Pawar
बोंडामध्ये आतून नुकसान करते, फुले खराब दिसतात आणि गळायला सुरुवात होते. कपाशीच्या बोंडाला छिद्रे आणि डाग पाडते.
फक्त बीटी कापसाची लागवड करणे, नॉन-बीटी झाडांचा अभाव, पीक अवशेषांचे योग्य निर्मूलन न करणे, हवामान बदल आणि रसायनांचा अतिवापर यामुळे गुलाबी बोंड अळीचा उद्रेक झाला आहे.
या किडीच्या अंडी, अळी, कोष, पतंग अशा चार अवस्था असतात. पतंग मादी १६० ते २५० अंडी घालते. अंड्यापासून २५ ते ३५ दिवसांत अळी तयार होते.
पीक काढणीनंतर झाडे छाटून खोलवर नांगरणी करावी. कचरा, बोंडे, गळलेली फुले शेतातून नष्ट करावेत आणि जिनिंग मिलमध्ये स्वच्छता ठेवावी.
तृणधान्यांसारख्या पिकांनी शेताची फेरपालट करावी. लवकर येणाऱ्या पण अति लवकर न पिकणाऱ्या जाती निवडाव्या. एप्रिल-मेमधील अति लवकर पेरणी टाळावी.
ट्रायकोग्रामा सारखे मित्र कीटक सोडावेत. बिव्हेरिया बॅसियाना बुरशीचा वापर करावा. नैसर्गिक भक्षक कीटकांचे संवर्धन करावे.
प्रति हेक्टर ५ ते १५ फेरोमोन सापळे लावावेत. त्यात गोळा होणाऱ्या पतंगांची दररोज मोजणी करावी. पिकाची नियमित तपासणी करावी आणि बोंडे फोडून अळी तपासावी.
किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच कीटकनाशक फवारणी करावी. विविध IRAC ग्रुपची औषधे आलटून पालटून वापरावेत. ड्रोन व एआय तंत्रज्ञानाने निरीक्षण करावे आणि "SPLAT" व "PB Knot" सारख्या नव्या तंत्रांचा वापर करावा.