Swarali Pawar
अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे केळीची झाडं वाकतात, पडतात. पण काही सोप्या उपायांनी तुम्ही तुमचं उत्पादन वाचवू शकता.
पावसानंतर सर्वात आधी शेतातील पाण्याचा निचरा करा. पाणी साचल्याने मुळे खराब होतात आणि झाडं कमजोर होतात.
वाकलेली झाडं बांबूने सरळ बांधा आणि आधार द्या. यामुळे झाडं कोलमडणं आणि उन्मळणं कमी होतं.
शेवरीचं कुंपण किंवा शेडनेट वापरून बाग सुरक्षित करा. यामुळे वादळी वाऱ्याचा थेट फटका झाडांना बसत नाही.
घडांना बंच कव्हर (पॉलीप्रोपीलीन) लावा. यामुळे पाऊस, गारपीट आणि किडींपासून संरक्षण मिळतं.
पानांवर काळे डाग दिसले तर लगेच उपाय करा. मेटिराम + पायराक्लोस्ट्रोबीन फवारणी उपयोगी ठरते.
प्रति झाड 20–25 लिटर पाणी द्या आणि वाफसा ठेवा. नत्र खत जास्त देऊ नका, संतुलित खत वापरा.
आधार, कुंपण, कव्हर, रोग नियंत्रण आणि पाणी नियोजन करा. यामुळे अवकाळीतही तुमची केळी बाग सुरक्षित राहील.