Anuradha Vipat
लग्नसराईसाठी तुम्ही खालील काही हटके आणि ट्रेंडी ब्लाऊज डिझाईन्स ट्राय करू शकता.
सध्या कोपरपर्यंत बाह्या असलेले ब्लाऊज प्रचंड ट्रेंडमध्ये आहेत. पैठणी किंवा सिल्क साड्यांवर अशा बाह्या खूप छान दिसतात.
मराठमोळ्या नऊवारी किंवा पैठणी साडीवर 'फुग्याचे स्लीव्हज' अत्यंत सुंदर दिसतात.
मटका गळा आणि त्यावर लटकन लावल्यास तो अधिक आकर्षक दिसतो.
जर तुम्हाला साध्या साडीवर मॉडर्न लूक हवा असेल, तर बोट नेक ब्लाऊज उत्तम पर्याय आहे.
ग्लॅमरस लूकसाठी पाठीवर खोल गळा ठेवून त्याला सुंदर नॉट आणि लटकन लावू शकता.
जर तुम्हाला प्रोफेशनल किंवा रॉयल लूक हवा असेल, तर एम्ब्रॉयडरी केलेले हाय-नेक ब्लाऊज घाला.