Anuradha Vipat
नुकतचं सारा तेंडुलकरने तिच्या एका गंभीर आजाराबद्दल सांगितलं आहे . साराला PCOS चा त्रास होता
PCOS मुळे साराच्या चेहऱ्यावर हार्मोनल पिंपल्स होते. साराने निरोगी जीवनशैली स्वीकारली आणि PCOS वर मात केली आहे
साराने तिच्या त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्येत अगदी मूलभूत आणि आवश्यक गोष्टींचा समावेश केला आहे.
सारा तिची सकाळची सुरुवात एक ग्लास पाणी, ड्रायफ्रुट्स आणि एक कप ब्लॅक कॉफीने करते असं तिने सांगितलं आहे
सारा सकाळी व्यायाम देखील करते ज्यामुळे तिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यास मदत होते.साराला शाळेपासूनच पीसीओएसचा त्रास होता.
सारा तेंडुलकर तिच्या सौंदर्य आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. सारा आज तिच्या फिटनेस आणि निरोगी त्वचेमुळेही चर्चेत असते.