sandeep Shirguppe
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर हे मुख्य शहर आहे. येथून सुमारे १० किलोमीटरवर कृष्णा नदीवर बोरगाव वसले आहे.
ऊस व भाजीपाला ही प्रमुख पिके व जोडीला दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांत आर्थिक सुबत्ता येण्यास या व्यवसायाचे मोठे योगदान आहे.
गावातील कै. धोंडीराम पाटील यांनी जाणत्या लोकांना एकत्र केले. त्यातून ‘बलभीम’ संस्थेची २६ नोव्हेंबर १९७९ मध्ये स्थापन केली.
मिरज येथे शासकीय दूध डेअरी सुरु झाल्यानंतर तिथे पुरवठा सुरू झाला. सन १९७९ मध्ये दुधाला १.१० ते १.३० रुपये प्रति लिटर दर होता.
सन १९९० पर्यंत दूध संकलन व विक्री एवढेच स्वरूप होते. त्या वेळी संस्थेची जबाबदारी कै. धोंडीराम पाटील यांचे पुत्र कै. अशोकराव यांच्याकडे आली.
त्यांनी दूधप्रक्रियेचे महत्त्व ओळखले. त्यासंबंधी संस्थेच्या संचालकांसोबत विचारविनिमय करून १९९३ मध्ये प्रक्रिया विभाग सुरू केला.
हळूहळू पलूस आणि कडेगाव तालुके काबीज केले. ‘माउथ टू माउथ’ असा प्रसार होऊ लागला. बाजारपेठेत उत्पादनांना मागणी वाढली.
मग २००९ मध्ये संयंत्रांची खरेदी करून नव्या तंत्रज्ञानाने उत्पादने तयार होऊ लागली. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा करणे सोपे झाले.
कोल्हापूर व परिसरातील काही प्रसिद्ध दूध संस्थांना भेटी देऊन प्रक्रियायुक्त उत्पादनांच्या निर्मितीची माहिती घेतली.
खवा, पेढा व त्यानंतर सन २००० पासून श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही अशी टप्प्याटप्प्याने उत्पादनांची श्रेणी तयार होऊ लागली.
कोल्हापूर येथे श्रीखंडासह अन्य पदार्थ तयार करण्यासाठीचे संस्थेतील काही लोकांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले. त्यातून दर्जेदार उत्पादने तयार होऊ लागली.