Anuradha Vipat
मिठाचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्याचे जास्त प्रमाण गंभीर समस्या निर्माण करू शकते.
मिठातील सोडियम शरीरातील पाणी धरून ठेवते. यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते.
सतत उच्च रक्तदाब राहिल्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो.
शरीरातील जास्तीचे मीठ बाहेर टाकण्यासाठी किडनीला जास्त काम करावे लागते. यामुळे किडनी निकामी होऊ शकते.
जास्त मिठामुळे मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर ताण येतो, ज्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या फुटण्याची शक्यता असते.
शरीरात पाणी साठून राहिल्यामुळे हात, पाय आणि चेहऱ्यावर सूज जाणवू शकते.
जास्त सोडियममुळे शरीरातून लघवीवाटे कॅल्शियम बाहेर टाकले जाते. यामुळे हाडे ठिसूळ होतात.