Healthy Salad : हेल्दी सॅलडसाठी 'या' ५ गोष्टींचा वापर करा; मिळेल पॉवर बूस्टर

Aslam Abdul Shanedivan

हेल्दी सॅलड

आपल्याला निरोगी आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर संतुलित आहार महत्वाचा असतो. यात हेल्दी सॅलडचा वापर करता येतो

Healthy Salad | agrowon

हेल्दी सॅलडमध्ये काय?

सॅलडमध्ये हिरव्या पालेभाज्यातील पालक आणि मेथीचा वापर करावा. यात जीवनसत्त्वे ए, सी, के आणि फॉलिक ॲसिडने असते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.

Healthy Salad | agrowon

नट आणि बिया

सॅलडमध्ये नट आणि बियांचा वापर करावा. यात भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, फ्लेक्ससीड, बदाम, अक्रोड, काजू आणि चिया बियांचा समावेश करावा.

Healthy Salad | agrowon

प्रोटीन पॉवर

हेल्दी सॅलडसाठी उकडलेले चणे, राजमा, पनीर किंवा टोफू यांचा वापर करावा. तसेच ग्रील्ड चिकन, टर्की किंवा उकडलेले अंडे ही सॅलडमध्ये वापरावे. जे प्रथिने वाढवण्याचे काम करतात.

Healthy Salad | agrowon

आरोग्य संतुलित करणारे घटक

हेल्दी सॅलडसाठी ऑलिव्ह ऑईल, लिंबाचा रस किंवा दही यासारख्या गोष्टींचा वापर करावा. ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले हेल्दी फॅट्स हृदयासाठी चांगले असतात. तर लिंबाचा रस तुमची पचनक्रिया सुधारते.

Healthy Salad | agrowon

एखादे ताजे फळ

सॅलडमध्ये गोडपणाचा आणण्यासाठी एखाद्या ताज्या फळाचे वापर करावा. संत्री, डाळिंब, सफरचंद आणि बेरीपैकी एक वापरावा.

Healthy Salad | agrowon

व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स

संत्री, डाळिंब, सफरचंद आणि बेरी यांसारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. (आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या)

Healthy Salad | agrowon

Tea Side Effect : दिवसातून किती वेळा चहा प्यावा, काय सांगतो अहवाल ?

आणखी पाहा